अॅपलने ८ जीबी व्हर्जनचा आयफोन फाईव्ह सी भारताच्या बाजारात सादर केला असून त्याची किमत ३७,५०० रूपये इतकी आहे. स्मार्टफोन बाजारात अधिक हिस्सा मिळविण्यासाठी हा फोन अॅपल फ्लॅगशीप आयफोन ५ एस सह गतवर्षीच जगभरात लाँच करण्यात आला होता. आता अॅपलचे लक्ष भारतीय बाजारात अधिक हिस्सा मिळविण्यावर आहे व त्यासाठीच हा नवा फोन भारतात आणला गेला आहे. फाईव्ह सी चे ८ जीबी व्हर्जन यापूर्वी फ्रान्स आणि युके मध्ये सादर केले गेले आहे.
अॅपलचा फाईव्ह सी आयफोन भारताच्या बाजारात
अॅपलचे स्मार्टफोन तुलनेने महाग असल्याने अॅपलला भारतीय बाजारात खपाच्या दृष्टीने पहिल्या तीन नंबरात स्थान मिळविणे अवघड बनले आहे. जगात अॅपल सॅमसंगच्या पाठोपाठ दुसर्या स्थानावर आहे. मात्र चीन आणि भारताच्या बाजारपेठा किंमतीच्या दृष्टीकोनातून संवेदनशील मानल्या जातात. त्यामुळे अॅपलने त्यांचा फाईव्ह सी तुलनेने कमी किंमतीत सादर केला आहे. पाच रंगात हा फोन उपलब्ध आहे. चार इंची रेटिना डिस्प्ले, ८ एमपीचा रिअर कॅमेरा फ्लॅशसह, १.२ एमपीचा फेसिग कॅमेरा अशी त्याची वैशिष्ठे आहेत. ग्लॉसी फिनिशमध्ये हा फोन सादर केला गेला आहे.