मोदी सरकार ;पण शिवसेनेचीच कोंडी

mahayuti
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये कुणाला काय मिळेल याबाबत स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. लोकसभा निवणुकीत भाजपच्या साथीने आणि रिपाईच्या मदतीने सेनेचे उमेदवार निवडणून आले;पण मोदी सरकारमध्ये स्थान मिळेल कि नाही या धास्तीत सेना गुरफटली आहे.

भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ छोटे असण्याची चर्चा सुरु असली तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मात्र या निर्णयाला आक्षेप घेतला आहे, सहकारी पक्षांना न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळ हे जंबोच असायला हवे असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. याअगोदर उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमधल्या घवघवीत यशानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही आक्रमकता भाजप कशा पद्धतीने हाताळते ?आणि युतीत या विषयावरून ‘कलगीतुरा ‘रंगतो का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.