दिवाळीत सोने २३ हजारांवर येण्याचे अंदाज

gold
मुंबई – सोने आयातीवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने कांहीसे शिथिल केल्याचा परिणाम सोने दरावर त्वरीत दिसून आला आहे. सध्या सोने ८०० रूपयांनी उतरले असले तरी दिवाळीपर्यंत सोन्याचे दर २३ ते २४ हजारांपर्यंत येतील असा अंदाज इंडियन बुलीयन अॅन्ड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष मोहित खंबोज यांनी व्यक्त केला आहे.

रिझर्व्ह बँकेने आयात निर्बंध कमी करताना कांही ठराविक ट्रेडिंग हाऊस तसेच बँकासाठीही निर्बंध शिथिल केले आहेत. आगामी अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्यूटी कमी केली जाणार असल्याचे संकेतही मिळत आहे. परिणामी सोने आयात वाढणार आहे तसेच सोने तस्करीलाही आळा बसणार आहे. यामुळे येत्या दिवसांत सोन्याचे दर उतरते राहतील असे खंबोज यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment