बसल्याजागी जेवण आणून देणारे रूमरोबो

robo
बसल्याजागी एक कप चहा मिळावा, जेवण मिळावे अशा माणसाच्या अनेक साध्यासाध्या अपेक्षाही अनेकवेळा पूर्ण होत नाहीत. मात्र संशोधक अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणसाचे जीवन आरामदायी बनविण्यासाठी कायम कार्यरत असतात. त्यातूनच आता आपण ज्या खोलीत जाऊ तेथे आपल्यामागून येणारे दिवे अथवा बसलो असू तेथे तुमचे जेवण पोहोचविणारे टेबल अशा सोयी केवळ कल्पना राहिल्या नसून प्रत्यक्षात येत आहेत. रूम रोबो असे संशोधकांनी त्यांचे नामकरण केले आहे.

स्वित्झर्लंडमधील बायोरोबोटिक्स लॅबोरेटरीतील संशोधकांनी हे रोबो तयार केले आहेत. यात मॉड्युलर रोबो बॉल्स तयार केले गेले असून हे बॉल्स एकत्र येऊन त्याचे फर्निचरमध्ये रूपांतर होऊ शकते. हे फर्निचर कुठेही आपलेआपण हलू शकते.प्रत्येक रूमरोबोला बॅटरी, तीन मोटर्स व वायरलेस अँटेना आहे. हे बॉल्स एकमेकांत गुंतण्यासाठी त्यांना छोटे पंजेही दिले गेले आहेत. हे रूमरोबो विशेष छिद्रे असलेल्या पृष्ठभागावर चढू शकतात. तुमच्या घरात असलेल्या सध्याच्या फर्निचरला हे सछिद्र पृष्ठभाग बसविता येतात. म्हणजे जेवण्याच्या टेबलाला तुम्ही हा पृष्ठभाग बसविला तर जेवणाचे टेबल तुमच्या इच्छेनुसार तुमच्यापर्यंत येते असे संशोधकांचे म्हणणे आहे. याच पद्धतीने दिव्याचे स्टँड व घरातील अन्य वस्तू तुमच्यापर्यंत बसल्याजागी पाहोचू शकतात.

Leave a Comment