पुण्यात बनलेली पहिली जग्वार लँडरोव्हर बाजारात

pune
टाटा मोटर्सची मालकी असलेल्या जग्वार लँडरोव्हर कंपनीने त्यांच्या पुण्यातील प्रकल्पात तयार झालेली जग्वार एक्स जे ३.ओएल गुरूवारी भारतात सादर केली असून या गाडीची किंमत आहे ९२ .१ लाख रूपये. ही डिझेल लक्झरी सलून दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. प्रिमियम लक्झरी आणि पोटेफोलियो अशी ही मॉडेल्स आहेत.

जग्वार लँड रोव्हर इंडियाचे उपाध्यक्ष रोहित सुरी म्हणाले की भारतात उपलब्ध असलेल्या लक्झरी सलून सेगमेंटच्या तुलनेत या गाडीची किंमत अतिशय वाजवी असून ग्राहकांकडून या गाडीला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

Leave a Comment