आशियात सर्वाधिक पब पुण्यात

pub
पुणे – महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे आता आशियातील सर्वाधिक पब असलेले शहर म्हणून उदयास आले आहे. तरूणाईत रूळलेली पब संस्कृती पुण्यात फोफावण्यास येथील आय टी उद्योगाची झालेली झपाट्याने वाढ कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे त्याचबरोबर शैक्षणिक हब म्हणून पुण्याची झालेली प्रगतीही तितकीच कारणीभूत ठरत असल्याचे तज्ञांचे मत आहे. पुण्यापाठोपाठ बंगलोरचा दुसरा नंबर आहे.

गेल्या कांही वर्षात पुण्यात आय.टी. उद्योगांनी आपले हातपाय मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुण्यात उपलब्ध आहेत. चांगले रस्ते, शॉपिंग मॉल्स, सर्व तर्हेुचे खाद्यपदार्थ पुरविणारी हायफाय, मध्यम स्वरूपाची हॉटेल्स तसेच असंख्य टपर्‍या, शिक्षणासाठीच्या उत्तम सोयी यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही पुण्यात पब सुरू केले आहेत.

गेल्या वीस वर्षात पुण्याने विकासात केलेली प्रगती आणि शैक्षणिक सुविधांमुळे अन्य राज्यातून पुण्यात दरवर्षी येत असलेल्या विद्यार्थ्यांचा लोंढा तसेच आय.टी कंपन्यातून नोकर्‍या करणारा कर्मचारी वर्ग यामुळे पुण्यात युवा संख्येचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे पब कल्चरला पोषक वातावरण मिळते आहे व यामुळे दरदिवशी नवीन पब शहरात सुरू होत आहे असे सांगितले जात आहे. सध्या शहरात उच्च दर्जाचे किमान ३० पब आहेत.

Leave a Comment