अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर आत्मघाती हल्ला

afganistan
काबूल – अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करजाई भारतात मोदी यांच्या शपथविधीसाठी येण्यापूर्वीच अफगाणमधल्या हेरत शहरातील भारतीय दूतावासावर दोन आत्मघाती हल्लेखोरांनी हल्ला चढविला आहे. आज म्हणजे शुक्रवारी पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोरांनी दूतावासाच्या शेजारच्या इमारतीतून बेधूंद गोळीबार केला. दूतावासातील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्यर दिले असून त्यात दोन्ही बंदूकधारी मारले गेले असल्याचे समजते.

अफगाण पोलिस प्रवक्ते अब्दुल रौफ अहमदी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी दीर्घकाळ गोळीबार सुरू होता. मात्र दतावासातील कुणालाही दुखापत झालेली नाही. याचवेळी एका कारमध्येही स्फोट झाला आणि त्यात कांही जण जखमी झाले आहेत. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने अद्यापी स्वीकारलेली नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही हल्ला झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

Leave a Comment