बँकांची एटीएम बोलणार

atm
मुंबई – अंध, अपंग , दुर्बल तसेच कमी ऐकू येणार्‍या व्यक्तींना बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणे यापुढे सहज साध्य होणार आहे. कारण रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बॅकांना ऑडिबल सूचना देऊ शकणारी तसेच ब्रेल की पॅड असणारी आणि एटीएमकडे जाणारा मार्ग उंचावर असेल तर तेथे रँपची सुविधा असणारी एटीएम असावीत असे आदेश दिले आहेत. वास्तविक हे आदेश २००९ मध्येच दिले गेले होते व त्यात बॅकांच्या एटीएम संख्येच्या किमान १/३ एटीएम वरील सुविधा असणारी हवीत असे निर्देश केले होते. त्यामुळे जुलै २०१४ पासून अशी एटीएम बसविण्याचे बंधन बॅकावर आले आहे.

याचबरोबर सर्व बँकांच्या शाखात मॅग्निफाईंग ग्लास किवा वाचण्यासाठी वापरण्यात येणारे भिंग ठेवण्याचे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यामुळे कमी दिसणार्‍या ग्राहकांची सोय होणार आहे. तसेच भिंग उपलब्ध असल्याची सूचना बँकानी ठळक जागी लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बोलकी एटीएम, ब्रेल की पॅड, रँप आणि भिंग यांची सुविधा पुरविण्यात काय प्रगती झाली याचा अहवालही बँकाना ठराविक काळात कस्टमर सर्वीस कमिटीकडे द्यावा लागणार आहे.

Leave a Comment