कॅबिनेटच्या बैठकीवरही ‘सुतक’

vidhansabha2
मुंबई – नरेंद्र मोदींच्या लाटेत कॉंग्रेसचे साम्राज्यच ‘खालसा’ झाले ,भले-भले हरले,देशातच काय महाराष्ट्रातही प्रस्थापितांचे बुरुज ढासळले. परिणामी कॉंग्रेसच काय मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण उफाळले आहे.मुख्यमंत्री हटावचा नारा देवूनही काहीच उपयोग नाही,या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली ;पण ‘सुतकी’ वातावरणातच.

लोकसभेची आचारसंहिता संपूर्णपणे उठवल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. यात 4-5 निर्णय घेण्यात आले. मात्र, आजच्या बैठकीकडे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पाठ फिरवली मात्र त्यावरूनही तर्क-वितर्क सुरु झाले आहे. तर नाराज असूनही रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत कस काय झाले ,ही वेळ का ओढवली … आता विधानसभा निवडणुका आहेत,एकत्र लढूया यावरच चर्चा झाल्याचे समजते. पण या बैठकीत मंत्र्यांचे चेहरे धास्तावलेलेच होते.

Leave a Comment