आता एटीएममधून ५० रुपयेही काढा

atm
रायपूर – रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आता सर्व बँकांच्या एटीएममधून पन्नास रुपयेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे एखाद्याला सातशे पन्नास रुपये काढावयाचे असतील तर ते आता शक्य आहे.

आपल्या एटीएममध्ये १०० आणि ५०० च्या नोटांसोबतच १०, २० आणि ५० रुपयाच्या नोटा ठेवण्याचे निर्देश ऑगस्ट २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिले होते. परंतु, बहुतांश बँकांनी अजूनही या सूचनेचे पालन केलेले नाही. त्याचा फटका ग्राहकांना बसत असल्याने रिझर्व्ह बँकेने बँकांना सक्त ताकीद दिली आहे. एटीएममध्ये शंभरासोबतच ५० रुपयाच्या नोटाही ठेवण्याची ताकीद सर्व बँकांना देण्यात आली आहे.

अनेक बँका आपल्या बऱ्याचशा एटीएममध्ये फक्त १००० आणि ५०० रुपयांच्या नोटाच ठेवतात. त्यामुळे ज्यांना कमी पैसे काढायचे असतात त्यांना विनाकारण जास्त पैसे काढावे लागतात. हा त्रास दूर करण्याच्या हेतूने, प्रत्येक बँकेने ५०० सोबत १०० रुपयाच्या आणि शंभराच्या नोटांसोबत ५० रुपयाच्या नोटा एटीएममध्ये ठेवल्याच पाहिजेत, अशा कडक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रायपूरमधील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ५० रुपयाच्या नोटा मिळू लागल्या आहेत.

Leave a Comment