आता आत्मचिंतन करा ;नीलम गोऱ्हे यांचा मनसेला टोमणा

gorhe
पुणे- खणखणीत ,सणसणीत आणि रोखठोक शैलीत नवनिर्माणाची भाषा करणाऱ्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे ‘ग्रह’ फिरल्याचे लोकसभा निवडणुकीतील दणदणीत पराभवामुळे स्पष्ट झाले आहे, दोनच दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंकडून शालजोडीतला टोमणा मिळाला नाही तोच पुण्यात शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनीही मनसे पर्यायाने राज ठाकरे यांना ‘टार्गेट’ करताना आता चिंतन करा असा टोमणा लगावला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना .नीलम गोऱ्हे म्हणाल्या ,लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवल्यामुळे राज्यात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याची पुनरावृत्ती होईल.असा दावाही त्यांनी केला ;पण मनसेच्या अपयशावर तोंडसुख घेताना मात्र लोकसभा निवडणुकीत जे पक्ष शून्यावर राहिले आहेत, त्यांना चिंतन करण्यासाठी भरपूर वेळ आहे,असे त्या म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या संदर्भातील निर्णय महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदा होईल,असा विश्वासही व्यक्त केला.

Leave a Comment