प्रदूषित हवा स्वच्छ करणारी कविता तयार

poem
यूकेतील संशोधकांनी हवेतील प्रदूषण कमी करणारी जगातील पहिली कविता तयार करण्यात यश मिळविले आहे. एका विशिष्ठ प्रकारच्या मटेरियलवर प्रिंट केलेली ही कविता दर दिवशी २० मोटरसायकल जेवढे प्रदूषण करतात ते स्वच्छ करण्यास सक्षम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड मधील प्रो. टॉनी रायन यांनी कवी सिमन यांची ही कविता -इन प्रेझ ऑफ एअर – हवा प्रदूषण कमी करणारी कविता म्हणून वापरली आहे.

यासाठी संशोधकांनी १० बाय २० एमएमचा खास मटेरियलचा तुकडा विकसित केला आहे. मटेरियल मायक्रोस्कोपिक पोल्युशन खाणार्‍या कणांपासून म्हणजे टिटॅनियम डाय ऑक्साईडपासून तयार केले गेले आहे. सूर्यप्रकाशाचा वापर करून ऑक्सिजनच्या सहाय्याने हे मटेरियल हवा प्रदूषित करणार्‍या नायट्रोजन ऑक्साईडचे शोषण करून घेते. रस्त्यातील जाहिराती, फलक यांच्यावरही या मटेरियलचा वापर सहज करता येतो.

संशोधक टॉनी रायन यांच्या मते हा विज्ञान आणि कलेचा अनोखा संगम आहे. त्यामुळे प्रदूषणासारख्या गंभीर प्रश्नावर शहरे, गावागावातून जागृती करता येईलच पण त्याचबरोबर प्रदूषित हवेपासून नागरिकांचे संरक्षण केले जाणार असल्याने आजारांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. ही कविता अल्फ्रेड डॅनी बिल्डींगवर लावण्यात आली असून ती १ वर्षासाठी तेथे ठेवली जाणार आहे.

Leave a Comment