चीन सरकारची विंडोज आठ वापरावर बंदी

china
चीन सरकारने त्यांच्या सरकारी कार्यालयातून लॅपटॉप, टॅब्लेट, डेस्क टॉप वर विंडोज आठ वापरण्यावर बदी घातली असल्याचे वृत्त आहे. मायक्रोसॉफ्ट या अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीने विंडोज आठ बाजारात आणले आहे. या कंपनीने पूर्वीच्या त्यांच्या विंडोज एक्सपी चा सपोर्ट बंद केल्याच्या निषेधार्थ चीन सरकारने विंडोज आठच्या वापरावर बंदी आणल्याचे सांगितले जात आहे.

मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी तील सहा लष्करी अधिकार्‍यांवर अमेरिकी संस्थांवर हेरगिरी केल्याचा आरोप करून कारवाई केली आहे. ही कारवाई झाली त्याच्या दुसर्‍याच दिवशी चीनने विंडोज आठ च्या वापरावर बंदी आणली आहे. तसेच चीन अमेरिका सायबर ग्रुपचे कामही बंद केले आहे. कारण देताना मात्र विंडोज एक्सपीचा सपोर्ट बंद केल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे कारण देण्यात आले आहे.

Leave a Comment