‘आप’मध्ये निवडणूक निधीवरून कलह

aap_25आपनाशिक – एकीकडे मी भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचे छातीठोकपणे सांगणाऱ्या आम आदमी पार्टीच्या सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षातच निवडणूक निधीवर डल्ला मारण्यात आला आहे. नाशिकमध्ये खुद्द सचिवाने हा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकादरम्यान आम आदमी पार्टीने प्रचारासाठी जमा केलेल्या निधीत नाशिकमधील नेत्यांनी पैशांचा अपहार केल्याचा आरोप सचिव मुकुंद बेनी यांनी केला आहे. यामुळे ‘आप’मधील अंतर्गत कलह पून्हा चव्हाट्यावर आला आहे .

नाशिकमधील आपचे नेते विजय पांढरे यांनी प्रचारासाठी जमा झालेल्या पैशांतून १५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप बेनी यांनी केला आहे. आपचे समन्वयक जितेंद्र भावे यांनी हे आरोप फेटाळले असले तरी या आरोपांनंतर बेनींना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेची किमया करणाऱ्या आम आदमी पार्टीचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. लोकसभा निवडणुकीआधी तिकीट वाटप तसेच विविध मुद्यांमुळे आपमधील अतंर्गत वाद उघडकीस आले होते. त्यात ‘आप नेत्यांमधील धुसफूस कायम असल्याचे नाशिकमधील या प्रकारामुळे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment