विधानसभेची ‘लगीनघाई’;पण युतीत ‘कलगीतुरा’?

vidhansabha
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे भाजप-शिवसेना युतीत आनंदाचे वातावरण आहे;मात्र विधानसभा निवडणुकीवरून जागा वाटपात आगामी काळात ‘कलगीतुरा’ रंगण्याची चिन्हे आहेत,मंगळवारी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडताना महाराष्ट्रात युतीतील जागावाटपाचे सूत्र बदलणार नसल्याचे स्पष्ट करताना सेनाच हा युतीत मोठा असल्याचे दाखवून दिले.

महाराष्ट्रातील महाविजयानंतर उद्धव आज दिल्लीत पोहोचले. एनडीएची बैठक, एनडीएच्या नेत्यांनी घेतलेली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट आटोपल्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची पुढची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,देश मजबूत करण्यासाठी आम्ही भाजपसोबत मिळून काम करणार आहोत. मंत्रिपदाबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा झालेली नाही. मोदींचा शपथविधी झाल्यानंतर त्याबाबत चर्चा होईल. शिवसेनेला त्याची कोणतीही घाई नाही असेही त्यांनी नमूद केले.

आम्ही आता एकजूटीने विधानसभा निवडणुका लढणार आहोत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात जो आक्रोश दिसला तोच आक्रोश विधानसभेलाही दिसेल. संपूर्ण महाराष्ट्रालाच आता काँग्रेस नकोसा झाला आहे, असे ते म्हणाले ;पण जागावाटपावरून भूमिकाही मांडली.

Leave a Comment