… राज ठाकरेंचा ‘पानउतारा ‘

rajthakeray
नवी दिल्ली – शिवसेनेला ‘औकात’ दाखवण्याचे वक्तव्य करताना आता कशी वाट लावतो असे वक्तव्य करणाऱ्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना ‘गर्वाचे घर खाली ‘ याचा अनुभव घ्यावा तर लागत आहे ;मात्र लोकसभेतील सेनेचे यश पाहून मनाचा मोठेपणा दाखवीत फुलांचा गुच्छ मातोश्रीवर पाठविण्याचा प्रकारच राज ठाकरेंच्या अंगलट आला आहे.उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष फटकारताना आता चार फुटी विधानसभेनंतर १५ फुटी फुलांचा गुच्छ पाठवावा लागेल असा टोला लगावताना मनसेच्या अस्तित्वावरच घाला घातला.

नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले विधानसभा निवडणूकीतही राज्यात शिवसेनेला विक्रमी यश मिळेल असा विश्वास व्यक्त करताना ,लोकसभा निवडणूकीतील शिवसेनेच्या यशानंतर शुभेच्छा म्हणून ‘त्यांनी’ चार फुटी फुलगुच्छ पाठविला होता. विधानसभेनंतर त्यांना १५ फूटी फुलगुच्छ पाठवावा लागेल असा टोला मनसे अध्यक्ष राज यांना लगावला . महाराष्ट्रात महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले आहे. हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे. त्यामुळे झालेल्या पराभवावरून महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्यात यावे. असेही ते म्हणाले.

Leave a Comment