अमेरिकेतील कॅलिफोनिर्यातील कंपनीने एरो एकस हॉवर बाईक तयार केली असून ही मोटरसायकल हवेत उडू शकते.२०१७ साली ही मोटरसायकल बाजारात आणली जाणार असून तिची किंमत आहे ८५ हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे ४९ लाख रूपये. या मोटरसायकलसाठी आत्ताही ५ हजार डॉलर्स भरून बुकींग करता येणार आहे.
मोटरसायकलवरून करा उडत उडत प्रवास
दोन प्रवासी बसू शकतील अशी ही मोटरसायकल १० फूट उंचीवरून ताशी ७२ किमीच्या वेगाने हवेतून उडू शकणार आहे. तिला चाकाऐवजी कार्बन फायबर रोटर्स लावले गेले आहेत. त्यामुळे ती रनवे शिवाय उडू शकेल आणि जमिनीवर उतरूही शकेल. अन्य बाईकप्रमाणेच ती चालेल. त्यासाठी चालविणार्याला केवळ १ ते २ दिवस प्रशिक्षण घ्यावे लागले. बाईकचे वजन ३६५ किलो असून ती १४० किलो पर्यंतचे वजन वाहून नेऊ शकेल. एकदा त्यात इंधन भरले की ही मोटरबाईक ७५ मिनिटे हवेत उडू शकणार आहे.