मुंबई – विमानसेवा क्षेत्रातील प्रमुख कंपनी `स्पाईस जेट’ला जानेवारी-मार्च 2014 च्या तिमाहीत 321.51 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीला हा तोटा मुख्यत्वे मागील तीन महिन्यात रुपया-डॉलरच्या तुलनेत घसरल्याने आर्थिक मंदी आणि कमकुवत मागणीमुळे झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत स्पाईस जेटला 185.71 कोटी रुपये एवढा तोटा झाला आहे. जानेवारी-मार्चमध्ये वार्षिक आधारावर उत्पन्नात 8.4 टक्के वृद्धी होऊन उत्पन्न 1589.61 कोटी रुपये झाले. मागील वर्षी हे उत्पन्न 1466.74 कोटी रुपये एवढे होते. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये स्पाईसजेट एकूण तोटा 1003.24 कोटी रुपये आहे. तर मागील वर्षी एकूण तोटा 191.07 कोटी रुपये एवढा होता. स्पाईस जेटच्या म्हणण्यानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेत लवकरच सुधारणा होणार आहे.