वंध्यत्वाचा आयुर्मानाशी संबंध

baby
वॉशिंग्टन – अलीकडच्या काळात पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंचे प्रमाण कमी झाल्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्व झालेल्या पुरुषाची प्रजोत्पादनाची क्षमता कमी होतेच पण त्याचा आरोग्यावर इतरही काही प्रकारांनी परिणाम होतो का? यावर अमेरिकेत संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात असे आढळून आले आहे की, वंध्यत्व आलेले पुरुष कमी जगतात.

शुक्राणूंचे प्रमाण कमी असलेले पुरुष ते प्रमाण सामान्य असलेल्या पुरुषांपेक्षा कमी जगतात असे सॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शुक्राणूंची संख्या कमी असणारे पुरुष ती सामान्य असणार्‍या पुरुषांपेक्षा सरासरी आठ वर्षे कमी जगतात असे दिसून आले आहे.

या संस्थेत १९८९ पासून २०११ पर्यंत प्रजजन क्षमता तपासण्यासाठी आलेल्या १२ हजार पुरुषांच्या नोंदी ठेवण्यात आल्या होत्या. २० ते ५० वर्षे वयोगटातल्या या पुरुषांच्या आयुर्मानाच्या नोंदी ठेवल्या असता वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त असलेले पुरुष तुलनेने कमी जगतात असे दिसून आले.

Leave a Comment