मोदींचे ड्रेस डिझाइन करतेय मुंबईची युवा डिझायनर

modi11
मुंबई – आज देशाच्या सत्तेसाठी दावा करत असलेल्या मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी कदाचित २३ तारखेला होणार असल्याची चर्चा सुरू असताना या शपथविधीच्या वेळी मोदी जो जोधपुरी सूट परिधान करणार आहेत, त्याचे डिझाईन करण्यात मुंबईची सई सुमन ही तरूण डिझायनर गुंग झालेली आहे. गेले महिनाभर सई या पोशाखाची तयारी करते आहे आणि हा पोशाख ती मोदींना भेट म्हणून देणार आहे.

निवडणुक प्रचार काळात मोदींची भाषणे जसा चर्चेचा विषय बनत होती तसेच मोदी घालत असलेले कपडे हाही अनेकांच्या चर्चेचा विषय बनला होता. मोदी तरूणांचेही या काळात स्टाईल आयकॉन बनले होते. हे सारे पोशाख सईनेच तयार केले होते असे समजते.

या संदर्भात सई सांगते, मोदींचे व्यक्तीमत्त्व, त्यांची देहबोली आणि खास करून सुती पोशाखाची त्यांची आवड लक्षात घेऊन तिने त्यांचे ड्रेस डिझाईन करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे मोदी कोणत्याही रंगाचे कपडे बिनधास्त वापरतात. अनेक नेते कांही विशिष्ठ रंगाचे कपडे वापरणे टाळतात मात्र मोदींचे तसे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ड्रेस डिझाईन करणे म्हटले तर सोपे आहे. अर्थात हे ड्रेस डिझाईन करताना त्यांचे व्यक्तीमत्त्व अधिक खुलेल आणि त्यातून साधेपणाही दिसेल याची दक्षता आवर्जून घेतली. मोदी प्रचारादरम्यान पोशाखावर जे कमळ लावत असत तेही सईनेच डिझाईन केलेले आहे असेही समजते.

Leave a Comment