प्रोटॉनमेल – सर्वात सुरक्षित ईमेल सेवा सुरू

protonmail
ईमेल हॅक केली जाणे अथवा अमेरिकेसारख्या देशाकडून अन्य देशांचे प्रमुख, नागरिक यांच्या ईमेलवर गुप्त पाळत ठेवणे या प्रकाराने धास्तावलेल्या युजरसाठी आता प्रोटॉनमेल नावाने सर्वात सुरक्षित ईमेल सेवा शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे युजरचे खासगीपण अबाधित राखले जाणार आहे असा या कंपनीचा दावा आहे.

अमेरिकेकडून ईमेल आणि फोन वर गुप्त पाळत ठेवली जात असल्याचा प्रकार स्नोडेन याच्यामुळे उघडकीस आल्यानंतर ईमेल सेवा देणार्‍या गुगल, याहू सह अन्य कंपन्यांनी ईमेल सुरक्षित बनविण्यासाठी काम सुरू केले आहे. प्रोटॉनमेलने त्यात आघाडी घेतली असून या प्रकल्पात हॉवर्ड, मॅसेच्यसेट, युरोपमधील प्रयोगशाळा असे अनेक संस्थातील संशोधक सहभागी झाले होते. प्रकल्पाचे प्रमुख जॉसॉन स्टॉकमन यांनी ही माहिती दिली.

जॉसॉन म्हणाले की युजरला या सेवेचे मूळ अकौंट मोफत दिले जाणार आहे मात्र जादा सुविधा हव्या असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल. चीन, इराण, रशियाने या सेवेचा वापर सुरू केला आहे. याचा सर्व्हर स्वित्झरर्लंडमध्ये असल्याने त्यात अमेरिकेचा हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment