
पुणे – पुण्याच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा आता रखडण्याची चिन्हे आहेत. विकास आराखड्यावरुन पून्हा एकदा भाजपने आक्षेप घेतल्याने विकास आराखड्यावरील सुनावणीदरम्यान पुन्हा गोंधळ झाला. पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरील सुनावणी आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. हरकती-सूचना नोंदविणाऱ्या अनेक नागरिकांना त्याबद्दलची माहिती न मिळाल्याने तसेच सुनावणीसाठी मिळणाऱ्या कमी वेळाबाबत आक्षेप घेण्यात आल्याने ही सुनावणी विरोधकांकडून बंद पाडली गेली होती.
पुण्याचा विकास आराखडा रखडणार
विकास आराखडाच रद्द करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. पुणे विकास आराखडा हा बिल्डर धार्जिण असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे. भाजप-सेनेने त्यावरून आंदोलन करत ही सर्व प्रक्रियाच रोखून धरली. अखेरीस, सर्वांना वेळेत नोटिसा पाठविण्याचे आश्वासन देत स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी सुनावणी प्रक्रिया स्थगित केली होती.
