सेनेला मंत्रिपद ;उद्धव ठाकरे दिल्लीत?

uddhavthakeray
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले आहेत. एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीला जात आहेत.शिवसेनेच्या मंत्रिपदांसाठीही मोर्चेबांधणी करणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या उदंड यशाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी कालच(सोमवारी) शिवसेना पक्ष प्रमुखांचे फोन करून अभिनंदन केले होते. आणि राजनाथ सिंहांनी याचवेळी फोनवर शिवसेना पक्ष प्रमुखांना एनडीएच्या होणाऱ्या बैठकीचे निमंत्रणही दिले होते. एनडीएच्या आज होणाऱ्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते म्हणून निवडण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आजच दिवसभरात राजधानी राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.