फॉरेन इन्स्टिटय़ूशनल इन्वेस्टर्सकडून 1 लाख कोटींची गुंतवणूक

fii
मुंबई – भाजपने सप्टेंबर 2013 मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर फॉरेन इन्स्टिटय़ूशनल इन्वेस्टर्स (एफआयआय) ने इंडियन सिक्युरिटी मार्केटमध्ये 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. मार्केट रेग्युलेटर बोर्ड सेबीच्या ताज्या आकडय़ानुसार, मोदींना पंतप्रधान उमेदवार म्हणून घोषित केल्यावर एफआयआयने भारतीय इक्विटी बाजारात 88,772 कोटी रुपये, तर बॉन्ड मार्केटमध्ये 13,399 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

याप्रकारे, एकूण गुंतवणूक 1,02,171 कोटी रुपये झाली आहे. भाजपने 13 सप्टेंबर 2013 ला मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते.मार्केट एक्सपर्टच्या माहितीनुसार, एफआयआयने नवीन येणारे सरकारकडून भारतीय बाजारात गुंतवणुकीला प्राधान्य देण्याच्यादृष्टीने गुंतवणूक केली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये फॉरेन इन्वेस्टर्सच्या माहितीनुसार, बीजेपीच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारला मिळालेला विजय गुंतवणुकीत आणखी वाढ करण्याची शक्यता आहे.

कार्वो कॅपिटलचे सीईओ स्वप्नील पवार म्हणाले की, एफआयआयच्या गुंतवणुकीत जोरदार वृद्धी होण्याची शक्यता आहे. एफआयआयने इक्विटी बाजारात मोठी गुंतवणूक केल्याने मुंबई शेअरबाजारात सेन्सेक्स 13 सप्टेंबरपासून 22 टक्क्यांनी वधारला आहे. 2014 मध्ये एफआयआयने देशी बाजारात 74,000 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. यामध्ये 41,000 कोटी रुपये शेअर्स आणि 33,000 कोटी रुपये बॉन्ड्समध्ये गुंतविले आहेत.

Leave a Comment