परदेशी नेत्यांचे आभार मानताना ओबामांकडे मोदींचे दुर्लक्ष

modi

लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणार्‍या बहुतेक सर्व परदेशी राष्ट्रप्रमुखांना धन्यवाद देताना मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. मोदींनी ट्वीटरवरून जपान, रशिया, नेपाळ , स्पेन, कॅनडा, संयुक्त राष्ट्राचे महासचिव तसेच दलाई लामा यांचे आभार मानले आहेत.

बराक ओबामा यांनी मोदी यांना निवडणूक जिंकल्याबद्दल फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या तर केरी यांनी ट्वीटरवरून मोदींचे अभिनंदन केले होते. ट्वीटरवर ट्वीट करताना मोदींनी या दोघांचाही उल्लेख केलेला नाही. रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांचे आभार मानताना मोदींनी रशिया आणि भारतात दीर्घकाळ असलेले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ व्हावेत ,भारत रशिया यांच्यातील परस्पर सहकार्य अधिक व्यापक स्तरावर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे तर जपान बरोबर गुजराथचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना आलेला अनुभव अतिशय चांगला असल्याचे नमूद केले आहे. जपानकडे आपण पूर्व आशियाचे पॉवरहाऊस म्हणून पाहतो असे सांगताना मोदींनी भारत जपान संबंध अधिक उंचीवर नेण्याची मनीषा व्यक्त केली आहे.

Leave a Comment