इंटेक्सचा अॅक्वा आयएस ५ एचडी स्मार्टफोन सादर

intex
हँडसेट निर्माते इंटेक्सने त्यांचा नवीन अॅक्वा आयएस ५ एचडी हा स्मार्टफोन बाजारात सादर केला असून त्याची किंमत आहे ९९९० रूपये. सध्या या फोनला अँड्राईड जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टीम दिली गेली असून जून अखेरी ती किटकॅटमध्ये बदलून घेता येणार आहे असे इंटेक्सचे व्यवसाय प्रमुख संजय कुमार कलिरोना यांनी सांगितले.

संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात १० हजार रूपयांच्या खालील जे स्मार्टफोन आहेत त्यातील उत्तम प्रतीच्या फोनमध्ये अॅक्वाचा समावेश आहे. डयुअल सिम, ५ इंची स्क्रीन, ५ एमपीचा फ्रंट व १३ एमपीचा रिअर कॅमेरा असे दोन कॅमेरे या फोनला दिले गेले आहेत. त्याची अंतर्गत स्टोरेज क्षमता ४ जीबी असून ती मेमरी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविता येते असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment