राज्यात आघाडीचे कार्यकर्तेच सैरभैर

maha
मुंबई – नरेंद्र मोदींच्या लाटेने भाजपचे ‘कमळ’ देशभरात उमलले आहे,उलट मित्रपक्षांनाही कधी नव्हे तो जागा जिंकून ‘बोनस’ मिळाला आहे.भल्या-भल्यांना ‘घरचा रस्ता ‘ जनतेने दाखविल्याने आता सत्ता भोगणाऱ्या पक्षांचे कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत,विशेषत;महाराष्ट्रात ही स्थिती उदभवली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची नरेंद्र मोदींच्या त्सुनामीत वाताहत झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेप्रमाणेच या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आता काय होणार असा प्रश्न पडला आहे.

या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड राजीनामा देतील का? हाच प्रश्न जनताच काय कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. मोदींच्या झंझावातात ४८ पैकी ४२ जागा महायुतीने जिंकल्या आहेत . काँग्रेसला राज्यात अवघ्या दोन तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये पराभवाची जबाबदारी स्वीकारून नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर, उत्तराखंडमध्येही काँग्रेसचे मुख्यमंत्री हरिष रावत यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाब वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील का ?यावरूनही गटा -तटाचे राजकारण उफाळून आले आहे.

Leave a Comment