दिल्लीविरूध्द पंजाबचे पारडे जड

punjab

नवी दिल्ली – आयपीएल स्पवर्धेत सोमवारी होत असलेल्याा लढतीत अव्वअल स्थाथनी असलेल्याी किंगज इलेव्हेन पंजाबची लढत तळाशी असलेल्याी दिल्लीम डेअरडेव्हिल्सत विरूध्दव होत आहे. या लढतीत पंजाबचे पारडे जड असून या सामन्याात विजय मिळवून आयपीएल स्प्र्धेतील अव्वजलस्थाजन कायम राखण्यावचे आवाहन त्यांाच्या समोर असणार आहे.

दिल्लीला यंदाही सूर गवसला नाही. ११ लढतींमध्ये केवळ दोनच विजय त्यांना मिळवता आले आहेत. गेल्या सहा लढतींमध्ये पराभव स्वीकारताना त्यांनी कुठलाही प्रतिकार केलेला नाही.सांघिक कामगिरी उंचावण्यात आलेले अपयश दिल्लीच्या लागोपाठच्या पराभवांना कारणीभूत ठरले आहे. कर्णधार केव्हिन पीटरसनसह दिनेश कार्तिक अशा सर्वच प्रमुख फलंदाजांनी निराशा केली आहे.

गोलंदाजीतही तीच परिस्थिती आहे. ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर तसेच वीरेंदर सेहवाग तसेच मध्यमगती संदीप शर्मा, डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल, अष्टपैलू ऋषी धवन तसेच शिवम शर्माच्या सातत्यामुळे पंजाबचा संघ सर्वसमावेशक वाटतो. त्याअमुळे हा सामना पंजाब जिंकेल असे वाटत आहे.

Leave a Comment