कॉंग्रेस राष्ट्रीय की प्रादेशिक पक्ष

congress_25
लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसची कामगिरी कॉंग्रेसच्या भवितव्यावर अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. देशाच्या सात राज्यात कॉंग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. जम्मू काश्मीर, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि झारखंड या राज्यात कॉंग्रेसचे खाते उघडलेच नाही. हरियाणा १, पंजाब ३, उत्तर प्रदेश २, महाराष्ट्र २ अशी अन्य राज्यातली कामगिरी राहिली.

सर्वाधिक जागांच्याबाबतीत कॉंग्रेसचा क्रमाक दुसरा असला तरी पहिला नंबर असलेली भारतीय जनता पार्टी (२८०) आणि कॉंग्रेस (४४) यांच्यातील अंतर फार मोठे आहे. तृणमूल कॉंग्रेस (३४), अण्णा द्रमुक (३७), बिजू जनता दल (२०) आणि शिवसेना (१८) या प्रादेशिक पक्षांनीसुध्दा कॉंग्रेसच्या जवळपास जागा मिळवल्या आहेत. त्यांच्या प्रभावाचे क्षेत्र विचारात घेता त्यांना मिळालेले यश कॉंग्रेसपेक्षा चांगले आहे.

लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष म्हणून एकूण जागांच्या किमान १० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत. हा आकडा ५४ एवढा होतो. पण कॉंग्रेसला ४४ जागा मिळाल्या असल्यामुळे या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता नाही. कॉंग्रेसला देशभरात १९.३ टक्के मते मिळाली आहेत. तर भाजपाला ३१.१ टक्के मते मिळाली आहेत.

Leave a Comment