मुंबई – आघाडी सरकारची सत्ता बरखास्त करून राज्यात त्वरीत निवडणुका घेण्यात याव्यात अशी आग्रही मागणी भाजपने केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली असून राष्ट्रवादीवरही त्यांनी टीका केली आहे. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे कि ,जनतेने राज्यातील आघाडी सरकारला पूर्णपणे नाकारले आहे. या नामुष्कीची नैतिक जबाबदारी दाखवत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संपूर्ण मंत्रीमंडळाने राजीनामा द्यावा.
सरकार बरखास्त करा ,राज्यात निवडणुका घ्या ;भाजपची मागणी
राज्यातील जनतेने भाजप पक्षाला स्पष्टपणे बहुमत देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अहंकारी आणि मस्तवाल कारभारला कंटाळल्याचे दाखवून दिले आहे, त्यामुळे आघाडी सरकार बरखास्त करून तत्काळ विधानसभा निवडणुका घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत खासदारांचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी त्यांनी ‘नॅनो पार्टी’ ठरवले आहे.