मुंबईचा राजस्थानशी मुकाबला

ipl3

अहमदाबाद – आयपीएल-७ मधील साखळी लढतीत सोमवारी मुंबई इंडियन्सची गाठ तिस-या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्सशी पडणार आहे. दहा लढतीतून केवळ तीन सामनेच जिंकता आल्याने मुंबईचे या फेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यातमुळे राजस्थाबन संघासाठी हा सामना महत्वामचा असून या सामन्यासत त्यांना विजय आवश्यक आहे.

दहा लढतींमधून केवळ तीन विजय रोहित आणि सहका-यांच्या हाती लागले आहेत. उर्वरित चार लढती जिंकल्या तरी अव्वल चार संघात संघात स्थान मिळवणे, कठीण आहे. दुसरीकडे, शेन वॉटसन आणि कंपनीने ११ पैकी ७ लढती जिंकताना तिसरे स्थान मिळवले आहे. सूर हरवलेल्या मुंबईला हरवून आपले स्थान आणखी भक्कम करण्याला त्यांचे प्राधान्य असेल. खराब फलंदाजी मुंबईच्या अपयशाला प्रमुख कारणीभूत ठरली आहे.कर्णधार रोहितसह कोरी अँडरसन आणि कीरॉन पोलार्डने निराशा केलीय. गोलंदाजीतही आलबेल नाही. वेगवान गोलंदाज लसित मलिंगालाच केवळ अचूक आणि प्रभावी मारा करता आला आहे.

उर्वरित तीनपैकी दोन लढतीत विजय त्यांना पुरेसे आहेत.राजस्थानची जमेची बाजू म्हणजे त्यांची दुसरी फळी चांगली खेळत आहे. शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे आणि स्टीव्हन स्मिथला संजू सॅमसनची चांगली साथ लाभत आहे. ४२ वर्षीय लेगस्पिनर प्रवीण तांबेने सातत्य राखले आहे. त्याला जेम्स फॉकनर आणि करुण नायरने चांगली मदत होत आहे.

Leave a Comment