तैपेई – देशातील श्रीमंत व्यक्तींना भरावा लागणारा कर ४५ टक्के करावा या प्रस्तावाला तैवान संसदेने मंजुरी दिली आहे. परिणामी देशातील १० हजारांहून अधिक धनाढ्यांना आता ४० टक्के ऐवजी ४५ टक्के आयकर भरावा लागणार आहे. पुढच्या वर्षापासून त्याची अम्मलबजावणी केली जाणार आहे.
तैवानमध्ये धनवानांना भरावा लागणार ४५ टक्के कर
संसदेत मंजुर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ज्यांचे उत्पन्न ३ लाख ३३ हजार डॉलर्स किवा १ कोटी ९५ लाख रूपयांपेक्षा अधिक आहे अशा श्रीमंतांना ४५ टक्के कर भरावा लागणार आहे. आयकर कायदा फेररचनेचा हा मसुदा संसदेने एकमुखाने मान्य केला आहे. देशात बँकींग व्यवहारांवरही करवाढ केली गेली आहे. मात्र अल्प उत्पन्न गट म्हणजे नोकरदार व अपंग व्यक्तींना दिलासा देण्यात आला असून त्यांच्यावर कोणत्याही कराचा अतिरिक्त बोजा टाकला जाणार नाही.
श्रीमंतांना लागू केलेल्या करवाढीमुळे सरकारी तिजोरीत वर्षाला १२,६०० कोटी (६५ अब्ज तैवान डॉलर) ची भर पडणार आहे असे अर्थमंत्री चांग शँग फोर्ड यांनी जाहीर केले आहे.