सोनी पिक्चर्स काढणार स्नोडेनवर चित्रपट

sony
सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट ने अमेरिकेच्या आपल्याच तसेच विदेशातील नागरिकांच्या ईमेल व फोनवर नजर ठेवण्याच्या हालचालींचा पर्दाफाश करणारा एडवर्ड स्नोडेन याच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सोनीने पत्रकार ग्लेन ग्रीनवाल्ड याने लिहिलेल्या नो प्लेस टू हाईड या स्नोडेनवरील पुस्तकाचे अधिकार खरेदी केले आहेत.

जेम्सबाँडवरील बरेच यशस्वी चित्रपट काढणारे निर्माते मायकेल विल्सन आणि बार्बारा ब्रोकोली यांनी या चित्रपटासाठी सहकार्य करण्याचे कबूल केले आहे. मायकेल यांच्या मते राजकीय चित्रपटाचा त्यांचा अनुभव मोठा असून या चित्रपटामुळे सरकारच्या वतीने आपल्याच नागरिकांवर ठेवली गेलेली पाळत, नागरिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तीक स्वातंत्र्य यातले संतुलन कसे राखले गेले नाही याचे स्फोटक खुलासे होणार आहेत. या गंभीर प्रश्नाला चित्रपटाच्या माध्यमातून तोंड फोडले जाऊ शकणार आहे.

ग्रीनवाल्ड यांनी चित्रपट काढण्यासाठी पुस्तकाचे अधिकार दिल्याबद्दल त्यांचे आभार मायकेल यांनी मानले आहेत.

Leave a Comment