विरोधी पक्ष ‘गायब’होण्याचाही इतिहास

loksabha_9
पुणे – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांनी बहुमताच्या जोरावर देशाची सत्ता जवळपास हस्तगत करून कॉंग्रेस आणि मित्र पक्षांना मोठा हादरा दिला आहे,त्यात आम आदमी पक्षाची हवाही काढून टाकली आहे.भाजपने सत्तासमीकरणांचा नवा इतिहास रचला असला तरी यंदा मात्र विरोधी बाकांवर बसणारा विरोधी पक्षही ‘गायब’होण्याचा इतिहास प्रथमच घडला आहे.

भाजपने गेल्या तीस वर्षांतील लोकसभा निवडणुकांचे विक्रम मोडीत काढले आहेत.भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आतापर्यंत २७६ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला असून आणखी ६१ जागांवर एनडीएच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी मिळवली आहे. या सर्व जागा जिंकल्यास एनडीएचे संख्याबळ ३३६ एवढे होणार आहे. यात एकट्या भाजपचा वाटा २८४ जागांचा असणार आहे. या निकालांनी भाजपच्या आणि देशाच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेसी पक्षाला बहुमत मिळाले आहे,मात्र दुसरीकडे विरोधी पक्षाची संख्याबळ कॉंग्रेसच काय अन्य पक्षांनी गाठलेली नाही त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष नसल्याचा इतिहास घडला आहे.

५४३जागांच्या तुलनेत विरोधी पक्षासाठी १० टक्के म्हणजे ५५ जागा आवश्यक असतात पण तो आकडा कॉंग्रेसलाही गाठता आलेला नाही. कॉंग्रेस ४२ तर अण्णाद्रमुक ३५ ,तृणमूलकॉंग्रेस ३२ अशा जागा पाहता विरोधीपक्षासाठी एकही पक्ष सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तीन पक्ष एकत्र आले तर विरोधीपक्ष स्थापन करता येवू शकतो.

Leave a Comment