लक्ष्मणने केले एबी डिव्हिलीयर्सचे कौतुक

laxman

हैदराबाद – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या‍ आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंगजचा खेळाडू एबी डिव्हिलीयर्सने त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एबी डिव्हिलीयर्सच्याह या फटकेबाजीचे तोंडभरून कौतुक टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांने केले आहे.

यावेळी बोलताना लक्ष्माण म्हसणाला, दक्षिण आफ्रिकेचा शिलेदार एबी डिव्हिलीयर्सच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके आहेत. एका चेंडूवर तो तीन ते चार वेगवेगळया स्वरूपाचे फटके तो मारू शकतो. तो जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला रोखणे कठीणच असते. गोलंदाजाच्या पुढल्या चेंडूवर कोणता फटका खेळायचा आहे यासाठी त्याला जास्त विचार करावा लागत नाही. याबाबत तो क्षणार्धात निर्णय घेतो. त्याची चपळताही वाखाणण्याजोगीच आहे. ‘रनिंग बिटविन दी विकेट’मध्येही तो माहीर आहे. या सर्व कारणांमुळे तो ‘कम्प्लिट’ क्रिकेटर आहे.

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या यशाचे रहस्य आहे ते त्याच्या शांत स्वभावामध्ये आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी तो ध्यान विचलित होऊ देत नाही. धोनीकडे प्रचंड संयम आहे. मधल्या फळीत फलंदाजीला येऊन सामना जिंकून देण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, असेही यावेळी बोलताना लक्ष्मणने स्पतष्टा केले.

Leave a Comment