
मुंबई – देशात सर्वत्र अबकी बार नरेंद्र मोदी सरकार हा जयघोष होत असताना जल्लोषाचे वातावरण सातासमुद्रपारही आहे. न्युयॉर्क शहरातील टाईम स्क्वेअरला जल्लोष सुरु आहे. देशाच्या राजकारणात भाजपने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्व विक्रम मोडीत काढल्याने सत्तासामिकरण भाजपकडेच पोहचल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. तो भारतात तर आहे पण परदेशातही साजरा होत आहे.
भारतात अबकी बार … सातासमुद्रपार नमो नमो !
भारतात पार पाडलेल्या सोळाव्या लोकसभा निवडणूकीत मोदींना स्पष्ट बहुमत मिळत असल्याने भारतात जल्लोष होणे स्वाभाविकच आहे. मात्र या सोबतच विदेशात म्हणजेच अमेरिकेतील न्युयॉर्क शहरातील टाईम स्क्वेअरला जल्लोष बघायला मिळाला आहे. अमेरिकेत या वेळला रात्रीचे तीन वाजलेले आहेत. मात्र तरीही भारतीय जनता टाईम स्क्वेअर या चौकात जमा झाली आहे. आज भारतात मतमोजणी असल्याचे आणि त्यातही भाजपला बहुमत मिळत आहे. हे बघून विदेशातील भारतीयांनी जल्लोष केला आहे.
