कोलंबसाचे जहाज सापडल्याचा दावा

columbus
कोलंबसाने १४ -१५ व्या शतकात भारत शोध मोहिम हाती घेतली आणि प्रवास करताना तो भारताऐवजी अमेरिकेच्या किनार्‍याला लागला हा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. म्हणजे अमेरिकेचा शोध कोलंबसाला लागला तो योगायोगानेच . या मोहिमेसाठी त्याने जे जहाज वापरले ते सांता मारिया नावाचे जहाज सापडले असल्याचा दावा पुरातत्त्व अम्यासकांनी केला आहे. या शोधमोहिमेचे नेतृत्त्व बेरी विलफोर्ड यांनी केले होते.

अमेरिका शोधाची घटना घडून पाचशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर हे जहाज सापडल्याने त्याबाबत विशेष कुतुहल व्यक्त केले जात आहे कारण कोलंबसाचे हे जहाज बेपत्ता झाल्याचे मानले जात होते. पुरातत्व अभ्यासकांनी अनेक पुरावे तपासून खात्री करून घेतल्यानंतर हैतीच्या सागरतळाशी असलेलेले जहाज हे कोलंबसाचे जहाज असल्याचा दावा केला आहे. या सागरतळाशी आढळलेल्या ढिगार्‍यात या जहाजाचे अवशेष सापडले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. ही शोधमोहिम राबविताना कोलंबसाच्या डायरीचाही संदर्भ घेण्यात आला होता.

Leave a Comment