कॉंग्रेसचे ‘तीन-तेरा’;पण अशोक चव्हाण तरले !

chavan_9
मुंबई – नरेंद्र मोदी या एका व्यक्तिमत्वामुळे देशाच्या राजकारणात परिवर्तनाचे वारे वाहिले असले तरी भाजपला सत्तेच्या प्रवाहात आणले आहे. एका व्यक्तीमुळे कॉंग्रेस आणि मित्र पक्षांचे ‘तीन-तेरा ‘वाजल्याने अवस्था बिकट झाली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना आधी बाजूला सारणाऱ्या कॉंग्रेसने नंतर अचानक उमेदवारी दिली आणि त्यांनीच महाराष्ट्रात कॉंग्रेसची लाज राखली,ते म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण!

अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्यांच्यासाठी राजकारणातील परतीचे दार कायमचे बंद झाल्याचे बोलले जात होते. मात्र अनेक चढ-उतारानंतर अशोक चव्हाण यांच्या पदरी याप्रकरणात राज्य सरकारची क्लीन चिट पडली. त्यानंतरही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संतापामुळे अशोक चव्हाण यांची कोंडी कायम राहिल, असे चित्र निर्माण झाले होते. पण नांदेडमधील उमेदवारीने चव्हाण यांचा काँग्रेसमधील वनवास खऱ्या अर्थाने संपला. ही उमेदवारीही त्यांना नाट्यमयरीत्या मिळाली. देशात आणि राज्यात मोदीलाट असताना, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राज्यात काँग्रेसचे बहुतेक सर्वच उमेदवार पराभवाच्या छायेत गेलेले असताना चव्हाण हे मात्र या लाटेतून तरले आहेत. आणि आता ते ज्या राहुल गांधीनी आधी नाकारले होते ,त्यांच्यासमवेत संसदेत विरोधी बाकांवर बसणार आहेत.

Leave a Comment