आयपीएलच्या चौकशीसाठी मुदगल समिती

ipl

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलमधील भ्रष्टाचाराचा तपास करण्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. पटनायक व फकीर मोहम्मद इब्राहिम कलिफुल्ला यांच्या खंडपीठाने मुदगल समितीची स्थापना केली. या समितीमध्ये मुदगल यांच्यासह एल नागेश्विर राव व नीलय दत्ता यांचा समावेश आहे. आगामी काळात ही तीन सदस्य समिती भ्रष्टावचाराच्याख प्रकरणाची चौकशी करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. मुदगल समितीने ऑगस्टअखेरपर्यंत आपला अहवाल द्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ही समिती आयपीएल-६मधील स्पॉट फिक्सिंग व बेटिंगमधील आरोपी आणि ‘बीसीसीआय’चे निलंबित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर कारवाई न झाल्याच्या आरोपांची चौकशी करणार आहे.

आयपीएस अधिकारी बी. बी. मिश्रा हे मुद्गल समितीला सहकार्य करील, असेही न्यायायलयाने म्हटले आहे. मिश्रा हे उत्तेजक पदार्थविरोधी संस्थेचे (एनसीबी) उप महानिर्देशक आहेत. शिवाय ते न्यायमूर्ती मुद्गल यांच्या चौकशी समितीचे नेतृत्वही करतील. या चौकशी समितीमध्ये दिल्ली, मुंबई व चेन्नई येथील पोलीस दलातील एक-एक पोलिस अधिकार्याीचाही समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर एक प्रतिष्ठित माजी क्रिकेटपटूही या चौकशी समितीला सहकार्य करणार आहे. या चौकशी समितीला कोणालाही अटक करून चौकशी करण्याचा अधिकार असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Leave a Comment