म्यानमारमध्ये बस अपघातात 14 ठार

myanmar
यांगून – म्यानमार येथे नाय पई टो-यांगून महामार्गावर एक प्रवासी बस पलटी झाल्याने चार महिलांसह कमीत कमी 14 प्रवासी ठार, तर 29 प्रवासी गंभीर जखमी आहेत.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही बस 43 प्रवाशांना घेऊन यांगूनकडे जात होती. मात्र सोमवारी सायंकाळी कारला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या नादात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने महामार्गावरच पलटी होत ही बस पुलावरून खाली पडली. या दुर्घटनेवेळी मुसळधार पाऊस पडत होता. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment