मुंबई – निवडणुकीच्या धामधुमीत घरातील भांडणे चव्हाट्यावर आणून ‘वाट’लावतो असे वक्तव्य करणारे , मुलाखतीत कधीही मनोमिलन होऊ शकते असे भाष्य करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकसभेच्या आखाड्यात झालेल्या ‘दारूण’ पराभवानंतर आणि सेनेला मिळालेल्या घवघवीत यशानंतर एक पाऊल मागे घेत उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. परिणामी राजकीय वर्तुळात चर्चेचा फड रंगला आहे.
मनोमिलन ? ;राजचे एक पाऊल मागे ,उद्धव ठाकरेंचे केले अभिनंदन
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ पाठवून अभिनंदन केले आहे. लोकसभा निवडणूकीत शिवसेनेने उभे केलेल्या २० उमेदवारांपैकी १८ उमेदवार निवडून आलेले आहेत. या यशाचे अभिनंदन करण्यासाठी राज यांनी उद्धव यांना पुष्पगुच्छ पाठवला आहे. शिवसेनेच्यावतीने आंदेश बांदेकर यांनी हा पुष्पगुच्छ स्विकारला. मनसे आणि शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारदरम्यान चांगलीच जुंपली होती. मात्र, या निवडणूकीत मनसेच्या बऱ्याच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. यामुळे नव्या राजकीय गणितांची ही नांदीच तर नाही ना असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.