आगीमुळे स्फोट न होणारी किंवा कितीही काळ वापरली तरी कार्यरत राहणारी बॅटरी संशोधकांनी तयार केली आहे. या बॅटरीचे डिझाईन ती ज्या उपकरणांत वापरली जाईल त्या उपकरणांच्या तसेच युजरच्या सुरक्षेसाठीच करण्यात आले असल्याचे संशोधक लेनडेन आर्कर, जिओफ्री कोटस व त्यांच्या सहकार्यांनी सांगितले. हे संशोधक कॉर्नल विद्यापीठात कार्यरत आहेत.
फोनसाठी सुरक्षित बॅटरी तयार
बोईंग विमाने, इलेक्ट्रीक कारमध्ये वापरल्या जाणार्या लिथियम आयन बॅटर्या पेटल्याचे व त्यामुळे आग लागण्याचे प्रकार आपण अनेकदा ऐकतो. स्मार्टफोन अथवा टॅबलेटमध्ये अशाच प्रकारची बॅटरी वापरली जाते व या बॅटरीचा स्फोट झाला तर युजरला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन इलेक्ट्रोलाईट तंत्रज्ञानाचा वापर करून ही बॅटरी तयार केली गेली असल्याचे लेनडेन यांचे म्हणणे आहे. यात फ्लेमेबल द्रवाचा वापर करण्यात आला असल्याने आग लागण्याची शक्यता खूपच कमी होते असा त्यांचा दावा आहे.