नीता अंबानी रिलायन्सच्या संचालक मंडळावर

nitaambani
मुंबई – रिलायन्सच्या संचालक मंडळावर मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता यांची निवड करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. मुकेश यांचे काका व धीरूभाईंचे धाकटे भाऊ रामनिक अंबानी वयाच्या ९०व्या वर्षी संचालक पदावरून निवृत्त होत असून त्यांच्या जागी नीता अंबानी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. १८ जूनला होत असलेल्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नीता यांच्या नेमणुकीला संमती दिली जाणार आहे असे समजते.

नीता यांनी रिलायन्स फौंडेशनच्या प्रमुख म्हणून लक्षणीय कामगिरी बजावली आहे. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, ग्रामीण विकास, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात त्यांनी चांगले काम केले आहे. रिलायन्समध्ये पीएमएस प्रसाद आणि पी.के. कपिल या दोन व्यक्तीच अंबानी कुटुंबाबाहेरच्या असून हे दोघेही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत.

Leave a Comment