धुम्रपानाची सवय सोडण्यास मदतगार लायटर

lighter
सिगरेट पेटविण्यासाठी लायटर वापरला जातो असा आपला समज असेल तर हे जरूर वाचा. धुम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्या व्यसनींसाठी हे व्यसन सोडण्यास मदत करणारा लायटर तयार करण्यात आला आहे. अॅटा ग्रोफानी आणि कुजी नकानो या दोन विद्यार्थ्यांनी हा लायटर बनविला असून त्याचे नामकरण क्टिटबिट असे करण्यात आले आहे.

ब्राऊन विश्वविद्यालयात शिक्षण घेत असताना अॅटा ग्रोफानी याला सिगरेटचे व्यसन लागले. आणि हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला असा लायटर बनविण्याची कल्पना सुचली असे त्याचे म्हणणे आहे. या लायटर संबंधित अॅपशी जोडलेला असून त्यात तुम्ही किती वेळा सिगरेट ओढली, शेवटची सिगरेट कधी ओढली, तसेच सिगरेटवर तुम्ही किती पैसे खर्च केले असे सर्व रेकॉर्ड ठेवता येते. या लायटरला तसा प्रोग्रॅम फिड करता येतो. ठराविक काळानंतर हा लायटर काम बंद करतो.

लायटरचा खटका दाबताच ज्योत बाहेर येते पण या लायटरमध्ये अशी ज्योत बाहेर येत नाही कारण त्यात गरम होणार्‍या कॉईलचा वापर करण्यात आला आहे. तसेच त्यात छोटा एलइडीही बसविला गेला आहे. त्यावर रोज ओढलेल्या सिगरेट, शेवटची सिगरेट कधी ओढली याची माहिती दिसते आणि स्मार्टफोन अॅपमध्ये ही माहिती दीर्घकाळ स्टोअर केली जाते. या लायटरच्या वापराने सिगरेटचे व्यसन सहज सुटतो असाही संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment