नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुर मध्ये पहिल्यांदाच ‘कमळ ‘उमलले आहे, ते केवळ कट्टर स्वयंसेवकामुळे !नागपुरच नाही तर विदर्भातील सगळया दहाही जागांवर ठिकाणी महायुतीने बाजी मारली आहे.
कट्टर स्वयंसेवकामुळे नागपुरात ‘कमळ’!
निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन गडकरींना य निवडणुकीत पराभूत करण्याचे मनसूबे बांधले होते. पण, गडकरींचे काम आणि मोदींची लाट यामुळे गडकरी फार मोठ्या मतांनी आपल्या पहिल्याच लोकसभा निवडणूकीत जिंकले आहेत.
लोकसभेची यंदाची निवडणूक विदर्भातून काँग्रेसला भुईसपाट करणारी ठरली आहे. विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी आपले खाते ही उघड़ता आलेले नाही. यामुळे या निवडणूकीत विदर्भातून काँग्रेसची धुळधाण उडाली आहे.मात्र तब्बल ७ वेळा संघाच्या मुख्यालयातून दिल्ली गाठणारे विलास मुत्तेमवार पहिल्यांदाच मोठ्या फरकाने हरले आहेत.