ओबामांचे मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण

obamodi
वॉशिग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी रात्री नरेंद्र मोदी यांचे विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना अमेरिका भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले असल्याचे व्हाईट हाऊस प्रवक्त्या जेन पास्की यांनी सांगितले. ओबामांनी मोदींना भारताच्या भावी पंतप्रधानांचे अमेरिकेत स्वागत आहे असे सांगताना त्यांच्या पक्षाला भारतीय जनतेने दिलेल्या निर्णायक कौलाबद्दल अभिनंदन केले. तसेच दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होण्यासाठी दोघांच्याही सोयीनुसार वॉशिग्टन येथे भेट व्हावी असेही सुचविले असल्याचे पास्की यांनी सांगितले.

ओबामा आणि मोदी यांनी फोनवरून जागतिक आर्थिक परिस्थितीबाबतही चर्चा केली आणि ओबामा यांनी जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेला भारत जागतिक पातळीवर महत्त्वाची कामगिरी बजावेल अशी आशाही व्यक्त केली. मोदी आता भारताचे पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे अमेरिकन कायद्यानुसार अे वन व्हिसा मिळणार आहे. २००५ साली अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने गुजराथ दंगलीसाठी मोदींना जबाबदार धरून मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल व्हिसा नाकारला होता.