राणेंचा गड ढासळणार … तळकोकणावर पुन्हा शिवसेनेचा कब्जा !

rane
सिंधुदूर्ग देशातच काय महाराष्ट्रात कॉंग्रेसला जबरदस्त धक्का बसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. जनता जनार्दनाने भाजपला संधी दिल्याचे अधोरेखित झाले आहे. कोकणात तर कॉंग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांना धोबीपछाड मिळण्याचे स्पष्ट संकेत आहे,त्यांचे पुत्र निलेश राणे मतमोजणीत पिछाडीवर पडल्याने राणेंचा गड ढासळणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील सर्वात चर्चित मतदारसंघापैकीच एक रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे पहिल्या तीन फेऱ्यानंतर पिछाडीवर पडले आहेत. अर्थात हे प्रारंभीचे कल असून निकाल कधीही पलटू शकतो. राणे यांच्या विरोधातील सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी १८ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी पक्षादेश झुगारत नीलेश राणे यांच्या विरोधात काम केल्याने तळकोकणातील राणेंचा हा बालेकिल्ला यावेळी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी राणेंचे वर्चस्व संपवून शिवसेना पुन्हा आपला गड काबिज करणार का? हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment