नागपूर – भ्रष्टाचाराचे आरोप होवूनही भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नागपूरचा गड जिंकून ‘क्लीन ‘ असल्याचे दाखवून दिले आहे.
गडकरींचा ‘क्लीन’ विजय !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये भाजपचा हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.नितीन गडकरी यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून ‘आप’च्या अंजली दमानिया यांनी बरीच हवा निर्माण केली होती. गडकरी यांची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे नागपूरच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. गडकरी यांनी बाजी मारताना मतदारांकडून ‘क्लीन’चे सर्टीफिकेट मिळविले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेले गडकरी यांनी ‘आप’च्या अंजली दमानिया व काँग्रेसचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांचे कडवे आव्हान परतवून नागपूरचा गड जिंकला आहे.आणि कॉंग्रेसच्या वर्चस्वाला आता अस्तित्वावर आणून ठेवले आहे.