उद्धव ठाकरेंनी मानले कोकणी जनतेचे आभार

thakre
रत्नागिरी – कोकणात कॉंग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या साम्राज्याला खिंडार पाडून कोकणावर भगवा फडकविणाऱ्या विजयी उमेदवारांचे आणि जनतेचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

जनतेना दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार अशी भावना व्यक्त करताना ठाकरे यांनी उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका असा संदेशही आपल्या नवनिर्वाचीत खासदारांना दिला.

रायगडात विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांना सेनेचे आनंत गिते यांनी पराभवाची धूळ चारली आहे. तर, रत्नागिरी-सिंधुदूर्गमधून शिवसेना उमेदवार विनायक राऊत १ लाख ५० हजार ५१ मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार निलेश राणे यांचा राऊत यांनी पराभव केला आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघ निवडणूकी आधीच चर्चेत आला होता ,तो येथे आघाडीत झालेल्या तणावामुळे. राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसकर आणि त्यांच्या समर्थकांनी निलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिल्याने हा तणाव निर्माण झाला होता. याचा फटका कुठेतरी निलेश राणे यांना बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी प्रचारात कोकणावर संकट आले कि सेना कुठे गायब होते ? असा सवाल करणाऱ्या कॉंग्रेसनेते राणे यांना यंदा मतदारांनी नाकारले आहे.