दुखापतीमुळे झहीरच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह

zaheer

मुंबई- गेल्यां काही दिवसांपासून टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा कणा असलेल्या झहीर खान गेल्या काही दिवसांपासून दुखापतग्रस्त झाल्याने खेळू शकत नाही. वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर नेहमीच अनफट असल्याने डहीर खानला अनेक महत्वाच्या स्पधेला मुकावे लागले आहे.त्यामुळे आगामी काळात झहीर खान खेळू शकणार की नाही यावरून त्याची कारकीर्द अवलंबून राहणार आहे.

टीम इंढियाच्यान वेगवान मा-याची धुरा कपिलदेवनंतर भारताच्या झहीर खानने समर्थपणे सांभाळली होती. आतापर्यंत भारताच्या अनेक विजयांमध्ये तसेच २०११च्या वर्ल्ड कप विजयामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता. गेल्यार काही महिने त्याला दुखापतींनी सतावल्याचे दिसते आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला सहाव्या सामन्यात दुखापत झाली. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यातील दुखापतीमुळे त्याला उर्वरित आयपीएल मोसमाला मुकावे लागले आहे.

याबाबत झहीरचे प्रशिक्षक विद्याधर पराडकर म्हणाले की, ‘झहीर गेली १९ वर्षे क्रिकेट खेळतो आहे. असा कोणताही वेगवान गोलंदाज नसेल ज्याला दुखापत झालेली नाही. दुखापत ही वेगवान गोलंदाजांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. एका लहान गावातून झहीर आला आणि अथक मेहनतीच्या जोरावर मोठा क्रिकेटपटू झाला. आता तो ३५ वर्षांचा आहे, त्यामुळे या काळात दुखापती या होतच असतात, पण त्याने स्वत:ला योग्य पद्धतीने तंदुरुस्त ठेवले आहे. कारण एवढय़ा वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे सोपे नसते. त्याने आपल्या गोलंदाजीबरोबरच शरीरावरही मेहनत घेतली आहे आणि त्यामुळे तो अजूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळू शकत आहे. या दुखापतीतून सावरल्यावर तो दोन वर्षे आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट खेळू शकेल.’

‘दुखापतींमधून सावरण्यासाठी झहीरला बराच वेळ लागताना दिसत आहे. आता झहीर ३५ वर्षांचा असला तरी त्याने किती वर्षे खेळायला हवे, हा निर्णय त्यानेच घ्यायला हवा. जोपर्यंत तो क्रिकेटचा आनंद लुटतोय तोपर्यंत त्याने खेळायला हवे,’असे मत भारताचे माजी गोलंदाज बलविंदरसिंग संधू यांनी व्यक्त केले.

Leave a Comment